STORYMIRROR

kusum chaudhary

Classics

4  

kusum chaudhary

Classics

हरवलेले बालपण

हरवलेले बालपण

1 min
364

खेळ दंगामस्ती मुलांची

नाही कुठे आता राहिली

जागोजागी मोबाईल

वर मुले दिसू लागली


लंगडी कबड्डी खोखो

खेळ दिसेनासे झाले

इंटरनेट मोबाईलने

जग झाले सारे खुले


मोबाईल झाला आता

मुलांसाठी जीव कि प्राण

मोबाईल वर गेम खेळतात

हरवले आता बालपण


स्पर्धा जीवघेणी आता

मुलांसाठी आहे घातक

 बालपणीच बालकांना

अभ्यास आहे जाचक


हरवत गेले बालपण

होते दिवस सुखाचे.

जग जवळ आले जरी

नाही कुणीच कुणाचे


हरवलेले बालपण

आता एकदा जगावे

नाते अनमोल आहे

जगी सतत जपावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics