STORYMIRROR

kusum chaudhary

Action

3  

kusum chaudhary

Action

मखमली तन

मखमली तन

1 min
191

भूमी नटली श्रावणात

हिरवळ चोहीकडे सारी

 मखमली गालिचे तृणांचे

मखमली तन खूणवणारी


 रंगीबेरंगी पुष्पसुमनांचे डूल

वाढविती शोभा भूमीवर

रंगीबेरंगी फुलपाखरे 

 नाजूक बागडती वेलीवर


खळखळ वाहती निर्झर

फेसाळती जलाने धबधबे

मयूर कोकिळ मैना राघू 

भूमीचे लावण्य न्याहाळत उभे


रिमझिम पावसात भिजली 

चिंब धरणीची सारी काया

लोण्यागत मऊ मखमली तन

स्पर्श धरणीचा करीते माया


मखमली तनात अंकूर रूजे

धरणी लेकुरवाळी माझी माय

मखमली तनात इवलासा जीव

प्रेमाचा वर्षाव करतच जाय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action