माझा तिरंगा
माझा तिरंगा
पहा फडकतो तिरंगा नील गगनी
वाटे अभिमान तो मजला क्षणो क्षणी
तीन रंगात पहा ,भाव दावितो शुध्द
हिरवा दावी देश ,आहे सदा समृध्द
भगव्यात त्यागाची, भावना सांगे मनी
वाटे अभिमान तो, मजला क्षणोक्षणी 1
पाहून तिरंग्यास ,उर येतो भरुनी
क्रांती वीर लढले, तया कवटाळूनी
हुत्म्यास पांघरता , दुःख दाटते मनी
वाटेअभिमान तो, मजला क्षणोक्षणी 2
शान तिरंग्याची ती , मोद देई मनाला
श्वेत रंग संदेश , शांतीचा जगाला
कार्यरत रहाण्या, सांगे तो चक्रातूनी
वाटे अभिमान तो , मजला क्षणो क्षणी 3
सदा राखू या मान, आपुल्या तिरंग्याचा
नाही होऊ देणार अवमान कधी त्याचा
राहिल फडकत ,अखंडित गगनी
वाटे अभिमान तो, मजला क्षणोक्षणी 4
