STORYMIRROR

vaishali vartak

Action Inspirational Others

3  

vaishali vartak

Action Inspirational Others

जीवन एक संधर्ष

जीवन एक संधर्ष

1 min
201

कोणास वाटे जीवन तर,

 असे तीन अंकांचा खेळ .

कसे जगावे त्यात आनंदाने

तयाचा जमवावा लागे मेळ.


येई कधी दुःखाला भरती,

तर कधी आनंदाची लाट.

नसे निरंतर सदा तिमिरच,

तिमीरा नंतर प्रकाश वाट.


निसर्ग पण सहतो संघर्ष

चंद्र सूर्यास पण लागते ग्रहण

सरिता आक्रमिते विकट वाट

अवनी करे सतत भ्रमण.


यश मिळविण्या कष्ट अपार

जन्माला येताच, सुरु संघर्ष

स्वप्नपूर्ती, करण्या साकार

महेनतच करी जीवनी उत्कर्ष


दगडला पण, मिळवण्या देवत्व

 सहतो, टाकीच्या घावांचा संघर्ष

जीवन तर, आहेच संग्राम

ध्यानी ठेवा हाच एक, निष्कर्ष .


पहा आपले पंतप्रधानजी

लढले झेलीत अनेक संघर्ष

प्रेरणा देती सर्व जगाला

कसे जगावे, निष्काम सहर्ष.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action