STORYMIRROR

kusum chaudhary

Inspirational

3  

kusum chaudhary

Inspirational

पंढरीची वारी

पंढरीची वारी

1 min
141

जातो पंढरीशी

आम्ही वारकरी.

कर कटेवरी 

वाट पाहे हरी. ....(१)


ध्यास विठ्ठलाचा

लागला मनाला.

पाऊले चालती

वाट पंढरीला. ....(२)


मना समाधान

सुखाचा सोहळा.

पंढरीची वारी

आनंद वेगळा. ...(३)


जीवनात मोक्ष

मिळतो आम्हाला.

पंढरीची वारी

ओढ ही मनाला. ....(४)


वारी पंढरीची 

आनंद मनाला.

झालो उतावीळ

मुख दर्शनाला. ...(५)


भेटीलागे जीवा

लागलीसे आस.

विठू दर्शनाचा

जीवा लागे ध्यास. .....(६)


माहेर पंढरी

पांडुरंग पिता

पुंडलिक बंधू

रखूमाई माता. ....(७)


गजर नामाचा

राम कृष्ण हरी

सुंदर ते रूप

कर कटेवरी. ....(८)


भजनात मन

झाले आज दंग.

वारीत रंगती

विठूचे अभंग. .....(९)


राम कृष्ण हरी

महिमा नामाचा.

चुकवतो फेरा

जन्म मरणाचा. .....(१०)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational