STORYMIRROR

kusum chaudhary

Inspirational

3  

kusum chaudhary

Inspirational

माझा विठूराया

माझा विठूराया

1 min
162

उभा विटेवर

युगे अठ्ठावीस

जीव कासावीस

दर्शनाला


आषाढी कार्तिकी

पंढरीची वारी

वारकरी दारी

विठ्ठलाच्या


माझा‌ विठूराया

भावाचा भुकेला

सतत धावला

भक्तांसाठी


 आहे तिर्थक्षेत्र 

पंढरी नगरी

वैकुंठ भूवरी

भक्तालागी


तुझिया नामाचा

महिमा अपार

तरूया सागर

जीवनाचा


सखा पांडुरंगा

संकट भयाण

करा निवारण

कोरोनाचे


मन हे आतूर

आली एकादशी

चित्त तुजपाशी

दर्शनाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational