STORYMIRROR

kusum chaudhary

Inspirational

3  

kusum chaudhary

Inspirational

हात

हात

1 min
180

हातावर हात ठेवून

बसू नये आता तरी

आली आहे भयंकर

कोरोनाची महामारी


बंद झाली मंदिरेही

देव नाही मदतीला

दोन हात करूनच

हरवूया कोरोनाला


हात हातात घेऊन

करू समाजाची सेवा

हेवादावा मत्सराला

दोन हात दूर ठेवा


माणसात आहे देव

देव नाही मंदिरात.

असू देऊ माणुसकी

आपणही ह्रदयात


हवे प्रेम आपुलकी

नको नुसते दिखावे

सुख दु:ख संकटात

तळहाती शिर घ्यावे


मदतीचा हात देऊ

असू केव्हाही तत्पर

जीवनाचे सार्थक 

करू आता खरोखर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational