STORYMIRROR

kusum chaudhary

Classics

4  

kusum chaudhary

Classics

देव माझा विठ्ठल

देव माझा विठ्ठल

1 min
242

नामाचा गजर

रंगतो अभंग

वारकरी दंग

निशिदिन


पंढरीची वाट

हरीनाम मुखी

वारकरी सुखी

जीवनात


पंढरीच्या वाटे

भजनाचा छंद

स्वर्गाचा आनंद

अनुभव


देवा पांडुरंगा

भक्तांचा कैवारी

धावतो सत्वरी

संकटात


वैकुंठ सोडून

पुंडलिका भेटी

आला जगजेठी

पंढरीत


मकर कुंडले

कटी पितांबर

शोभतो सुंदर

पांडुरंगा


 पांडुरंगा प्रिय

 माळ तुळशीची

 उटी चंदनाची

सर्वांगाला


आवडे भक्ताला

पंढरीची वारी

येती नर नारी.

आषाढीला


विठ्ठल विठ्ठल

म्हणा राम राम.

करताना काम.

नित्यनेमे


देवा पांडुरंगा

पंढरीची वारी

दु:ख दूर सारी

मानवाचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics