STORYMIRROR

Varsha Nerekar

Classics

4  

Varsha Nerekar

Classics

आई

आई

1 min
349

 रोज नेम माझा असतो

ऑफीस मधून आल्यावर 

आईला जावून भेटतो

बरे वाटते तिला बोलल्यावर 


   थकले रे आता 

   आई म्हणाली जेंव्हा 

   काळजात धस्स झाले

   घालमेल झाली तेंव्हा 


तिचेही वय झाले 

मी कसा विसरलो

मान्य माझेही वय झाले 

पण तिच्यामुळे लहान राहिलो


   आज निरखून बघितले

   सुरकुतलेला हात धरला

   डोळे माझे पाणावले 

   हात डोक्यावर मीच घेतला


जादूची झप्पी दिलीआईला 

काही दिवसांत प्रवास संपेल

भावना कळली तिची मला

काळजी नको मी तुला जपेल


   कसनुस हसत 'बाळा' म्हणाली

   कंठ दोघांचा दाटून आला 

   बर्‍याच दिवसांनी हाक मारली 

   एक आवंढा मी गिळला 


आत्ताच जणू पोरका झालो

क्षण हळवे करून गेला 

डोळ्यातले पाणी पुसू लागलो

मी तिचा हात घट्ट धरला


   बळेच मग मी हसलो

   म्हणालो चल फिरुन येवू जरा

   तिच्यासह बाहेर पडलो

   तिचा हसरा चेहरा वाटला बरा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics