आई
आई
1 min
185
तिच्या उदरी श्वासाची सुरूवात
जन्माचे मूळ तिच्या गर्भ घरात
फक्त नऊ महिन्यांचे ओझे नसते
कधी नवजन्मा यम भेट असते
एक टॅहॅ ऐकत आनंदाचा डोह
तिचा पुनर्जन्म संततीचा मोह
पै ऐश्वर्य तिच्यापुढे मातीमोल
मृत्यूच्या दारात संघर्ष घनघोर
जीव जगवण्या वेदनांचा शोर
सुखरूप बालक ती नेत्री पाहते
श्वासांची लढाई माऊली जिंकते
क्षण क्षण सरतो काहूर माजवून
यम परततो 'ती'ला अजमावून
जगात म्हणून सर्व श्रेष्ठ ठरे माय
विचारता कसे ऋण तिचे काय
ममत्वाचा सागर बहु अनमोल
ऋण रक्ताचे फेडता नाही येत
माऊली जगते आशीर्वाद देत
बाप माय आधार जीवनी ठेवा
सुखाचे दान पदरी माझ्या देवा
जन्म जातो आई कळत नाही
आईचे छत्र भाग्यवंतांना काही
