STORYMIRROR

Varsha Nerekar

Others

3  

Varsha Nerekar

Others

बोल तू

बोल तू

1 min
108

जरासे बोल तू

गुपित मनातले खोल तू

खूप साठता मनात 

बोलावे जरा कानात

होवु नको तु हट्टी 

कर जरा गट्टी 

नको होवु तळ्यात मळ्यात 

मिसळून जा सगळ्यांत

कळू दे तुझे गुज

करू जरा हितगुज 

दोन अश्रू ओघळू दे

हास्य गाली खुलू दे

धागा विणू मैत्रीचा 

हात हाती सहकार्याचा

कळी तुझी खुलू दे

मधुर बोल ऐकू दे


Rate this content
Log in