STORYMIRROR

Varsha Nerekar

Others

3  

Varsha Nerekar

Others

पाऊस

पाऊस

1 min
207

पुन्हा कातर साद घालून गेला

तो सांजवेळी कोसळून गेला

काजळ भावनांचा ओलावा

डोळेही स्वच्छ करून गेला


दुःखावर फुंकर मारून गेला

उद्ध्वस्त किनारा पाहून गेला

पाऊस संततधार कोसळताना

हृदयातील पोकळी बघून गेला


गत वर्षांचा हिशोब करून गेला

गर्दीतही एकट्याला भेटून गेला

अंकुरलेल्या मना सुखावून गेला

स्वप्नांचा फुलोरा फुलवून गेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन