STORYMIRROR

Varsha Nerekar

Classics

3  

Varsha Nerekar

Classics

वसंत बहार

वसंत बहार

1 min
165

 सोन कांचन किरणे ऋतूराज घेई तान

वेध सृष्टीस लागले रानजाई डोले छान


छान पिंपळ पालवी सरे पानगळ दुख

वन देवता प्रसन्न दान हिरवाई सुख


सुख वसंत बहार घुमे कुहू कुहू नाद

बहुरंगी वसुंधरा आली ओळखीची साद


साद कृष्णास राधेची बासरीचा सूर कानी

मनोहर वृंदावनी चंपकाचा गंध रानी


रानी पाखर उत्सव गुलमोहराचा थाट

भावे स्वर्गीय नजारे पायघड्या लाल वाट


वाट घेऊन जातसे स्वप्नगावा क्षणभरी

हाती सुखाचे चांदणे मनी आनंद लहरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics