कान्हा
कान्हा
1 min
202
यशोदेचा कान्हा
मधुबनी आला
सुमन वर्षाव
स्वर्गातून झाला
हसले गोकुळ
चाहुल लागली
शांत जलाशय
कमळे डोलली
वाजवी बासरी
सावळा श्रीरंग
मधुर सुरात
होई राधा दंग
धुंद परिसर
वल्लरी हर्षित
मंत्रमुग्ध नाद
चित्त आकर्षित
गेलासे संदेश
घेऊन समीर
गोपाळ गोपिका
भेटाया अधीर
पौर्णिमेचा चंद्र
रासक्रीडा रंग
रमतात सारे
भक्तीचे तरंग
खेळे देवाधीश
सारे भाग्यवान
कृष्ण नाम मुखी
गाती गुणगान