कृष्ण आठवला
कृष्ण आठवला
1 min
153
थोडासा शांत काय बसलो
ते तत्वज्ञानाचे डोस देऊन गेले
खरे सांगतो तेव्हा अर्जुन आठवला
तत्व न पाळणारे
उगाच नितीमत्ता शिकवून गेले
खरे सांगतो तेंव्हा हताश कर्ण आठवला
कोलाहल माजले मस्तकात
कोणीतरी सखा हवा वाटून गेले
खरे सांगतो तेव्हा फक्त कृष्ण आठवला