STORYMIRROR

Pradip Kasurde

Classics

4  

Pradip Kasurde

Classics

घर गावचे

घर गावचे

1 min
969

 घर आमचे गावचे , आहे किती छान 

फळे फुले पशु पक्षी , सोन्याची ती खाण॥1॥


गार थंड गोड गोड , आडामधलं पाणी 

चिवचिव किलबिल , पक्षी गाती गाणी ॥2॥ 


ओटी पडवी अंगण, घर आहे छोटं 

साधी सुधी माणसं , मन त्यांचं मोठं ॥3॥


छोटी मनी मोठ्या वाघ्या, सारखी धावाधाव 

गायब होती क्षणात, फिरुनी येती गाव ॥4॥


हरिपाठाचा पारावरती, घुमतो मधुर नाद 

शुभंकरोती आजीसंगे,भजनाची साद॥5॥


गर्द राती गोष्ट रंगते, उजळून जाते घर 

येईल का सांगा तुम्ही, या सुखाची सर॥6॥


शहरातले घर मोठे,तरीही आवडे घर गावचे 

आईला नेहमी विचारतो ,कधी गावी जायचे॥7


वेळ येता निघण्याची, पाय निघत नाही 

आठवत राहतो गाव , भेटतो ठाईं ठाईं ॥8॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics