आजकालची मुलं
आजकालची मुलं
आजकालची मुलं
कधीच सिरयसली
आयुष्याचा विचार करीत नाहीत
तरीही मुलं आपल्या आयुष्यात
चमकून जातात _____
मुलं कधीच काही प्रश्न
विचारत नाहीत
तरीही मुलांना बरीच
उत्तरे माहित असतात______
मुलं कोणतीच गोष्ट
मन लावून करीत नाहीत
तरीही मुलं त्यांच्या आवडीची
गोष्ट सुंदर करतात______
मुलं आजकालची खूपच
बिघडली आहेत
परंतु मी ही कधीतरी
मुलंच होतो
मी ही कधीतरी मुलंच होतो____