Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

kishor zote

Children Stories

3  

kishor zote

Children Stories

मनिमाऊ ( बालकविता )

मनिमाऊ ( बालकविता )

1 min
356


मनिमाऊ अशी कशी

एकटीच बाहेर आली ?

रस्ता ओलांडतांना का

तुला भिती नाही वाटली ?


खरं खरं सांग मला 

तुलाही कंटाळा आला

चल जावू आपण असे

दूर मग खेळायला


घाबरु नकोस तू

नाहीस ग एकटी

झालीय आता ती

आपली नजरभेटी


खेळ खेळू धम्माल

आपण दोघी करू

बोल आता तू

अबोला नको धरू



Rate this content
Log in