मोठेपण
मोठेपण
लहान असता वाटे झटपट व्हावे मोठे,
मोठे करती जे जे सर्व करावे ते ते,
नको पुस्तके नको ती शाळा,
मित्र जमवुया हजार वेळा,
गप्पा टप्पा पत्ते कुटुया,
मनात येईल तेच करूया,
कोणी न रोकी कोणी न टोकि,
आपुकीच मग चालेल मस्ती,
नाट्य सिनेमा भटकंती अन,
हॉटेलातील चवीस्ट जेवण,
कधीतरी मग होईल पार्टी,
मुखी लावूया पानाची पट्टी,
छोट्यावरती रुबाब दाऊ,
घरात थोडा भावही खाऊ,
असी जगण्याची मजा लुटुया,
पटपट झटपट मोठे होवुया.