अंगाई
अंगाई
1 min
411
निज बाळा,निज बाळा,
गाते अंगाई.
शब्द सुमनांची माळ केली,
ये ग, ज्ञानाई.
निज बाळा,निज बाळा,
गाते अंगाई.
बोध अमृत पान्हा पाजी,
ये ग,बोधाई.
निज बाळा,निज बाळा,
गाते अंगाई.
हात हलवी पाय हलवी,
ये ग,क्रीडाई.
निज बाळा,निज बाळा,
गाते अंगाई.
झोक्यात झोपला बाळ तान्हा,
ये ग,निद्राई.
निज बाळा,निज बाळा,
गाते अंगाई.
हसतो बाळ छान माझा,
आली ज्ञानाई.
निज बाळा,निज बाळा,
गाते अंगाई.