STORYMIRROR

Shubhangi Patil

Inspirational Others Children

4  

Shubhangi Patil

Inspirational Others Children

आई

आई

1 min
506

दोन शब्दात व्यक्त न होणारी आस,

एकट्यात असताना हळूच जवळ घेणारा भास,

भूक नसली तरी भरवते ती दोन घास,

स्वार्थ न बाळगता आपण असतो तिच्या साठी खास...


मनात अपार माया आणि प्रेमाचा ती झरा,

जगाचे ते लटके हसू, परंतु तिचा राग सुद्धा खरा,

तीच कोमल स्मित पाहून, बदलते माझी तर्‍हा,

म्हणते ती 'मला काही नको तुमच्याच जीवनात आनंद भरा '....


सांभाळते ती बाबांना, मला आणि दादाला,

देते नेहमी पोषक आहार शरीराला आणि मनाला,

धावते पहाट पासून सांज पर्यंत नसेल का दम लागत तिच्या जिवाला,

फक्त देवाला साकड घालते खुश ठेव माझ्या चिमणी आणि छावाला...


झाली आमची कधी चिडचिड तरी केली तिच्यावर,

पण सगळा राग सहन करून घेतल नाही तिने मनावर,

तिला पाहिल की आता सुख होत अनावर,

आलीच मी आई तुझी काम पटकन आवर.....


तिच्या कुशीत झोपण्यासाठी आतुर आहे माझी काया,

हवं आहे मला तेच प्रेम आणि तीच माया.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational