लाईफलाँग फोटोग्राफ्स
लाईफलाँग फोटोग्राफ्स
टीपा तो क्षण जेव्हा पहिल्यांदा तुमच्या हातून चूक घडून सुद्धा वडिलांनी डोक्यावरून हात फिरवून समजावल होतं.....
आठवा तो क्षण जेव्हा लाडात येऊन तुम्ही आईकडे 'अजून एक लाडू दे ना 'चा हट्ट केला होता.......
Click करा तो क्षण जेव्हा भाऊ जवळ येऊन गाल ओढत म्हणाला 'काळी च तर आहे तू '....
Pose द्या तेव्हा जेव्हा पूर्ण कुटुंब सोबत बसुन करत होते टवाळखोरी.....
Edit करा त्या photograph ला जेव्हा दुःखाच्या क्षणी हातात हात देऊन तुमची माणस तुमच्या जवळ होती......
'Nice' comment द्या त्या picture ला जेव्हा खूप दिवसापासून दूर असणाऱ्या मैत्रिणीला मिठी मारली तुम्ही......
And खूपच महत्वाच...
डिलीट करू नका तुमच्या अपराधी क्षणाला कारण त्याच photograph ने संधी दिली तुम्हाला शिकायला......
These photos are uploaded on my ❤ heart and they stay forever in it😊
