माझा आवाज (एका त्रस्त महिलेचा आवाज)
माझा आवाज (एका त्रस्त महिलेचा आवाज)
जाच होतो मनाशी कोणास सांगावा,
त्रास होतो जिवाशी कोणासवे मांडावा.
रोज अश्रूंना वाट देते उशाशी,
दुःखात बुडून राहते मीच उपाशी.
मनातले विचार येतात डोंगर फोडूनी,
मग वाटे जग गेले का मला सोडुनी.
मनातले शंभर स्वप्नं बाजूला ठेवूनी,
गिळत राहावे दुःख हसतमुख राहूनी.
देव असतो का खरच? त्यावेळी प्रश्न पडे,
मग सांग ना देवा, माझ्यावरच का दुःखाचे सडे.
हवा असतो प्रत्येक वेळी आई वडिलांचा संग,
इतकंं सहन करूनही का होतात अपेक्षा भंग.
