माझ्या मनातली बाब
माझ्या मनातली बाब
आवडतात मला सजवायला माझ्या मनातली बाब,
कारण मनातलं ओठावर आल नाही तर कोण विचारत जाब?
आवडत मला room lock करून तासनतास नखरे करायला,
कारण तिथ नसत कोणी मला judge करायला.
आवडत मला आरश्यासमोर उभ राहून स्वतःशीच करायला वार्तालाप,
कारण जणू तिथेच होतो माझा माझ्याशी मिलाफ.
आवडत मला कधी- कधी mature आणि practically जगताना,
Immature बनून हट्ट करायला.
आवडत मला कधीतरी सांजवेळी शांत जागेवर जाऊन माझ्या स्वप्नांचा विचार करायला,
हजार स्वप्नं मनात भरायला.
आवडत मला pen आणि paper दिसले की काहीस छान लिहायला,
माझ्या मनातली बाब कोरून ठेवायला.
सध्याच्या वातावरणात जगताना मनातून हसण्याची संधी खूप कमी असते,
तेव्हा तुमच्या मनातली बाब करा....एक गोड स्मित तुम्हाला भेट देईल.
