जीव घाबरतो.....
जीव घाबरतो.....
कळत नाही जगात मीच अशी आहे की माझ्यासारख्या विचार करणार्या मुलीपण हे कोणाशी बोलू शकत नाही......
रोजच्या वागण्यात डोक्यात खूप विचार येतात ज्यांची उत्तर मलाच देता येत नाहीत आणि कोणाला विचारता पण येत नाहीत कारण विचारायला माझा जीव घाबरतो....
माझ्यामुळे पप्पांना टेन्शन आलेले मला अजिबात आवडत नाही आणि टेन्शन घेऊ नका असे सांगायला पण माझा जीव घाबरतो......
कोणी माझ्याकडून काही वस्तू मागितली की मी पटकन देते आणि मला लागत असलेली वस्तू कोणाकडे असली की मागायला माझा जीव घाबरतो.......
कोणावर मला राग आलेला असेल आणि मी व्यक्त केल्यावर ती व्यक्ती रुसेल म्हणून माझा जीव घाबरतो........
कधीतरी माझी चूक नसेल आणि तरी मी ओरडा खाल्ला असेल तर माझी चूक नाही हे सांगायला पण माझा जीव घाबरतो......
कोणी माझ्यामुळे दुखेल म्हणून जीव घाबरतो....
आणि कोणी बोलून दाखवेल म्हणून जीव घाबरतो.....
तर कोणी बोलणारच नाही म्हणून जीव घाबरतो.....
म्हणून कधीकधी वाटत अबोल रहावं....काही कोडी न सोडवताच जगावं...
