समटाईम्स लाईफ इज टू शॉर्ट...
समटाईम्स लाईफ इज टू शॉर्ट...
समटाईम्स लाईफ इज टू शॉर्ट...
दिवस उजाडला तसा सुरू होतो कामाचा भार,
मग वेळच कुठे उरतो विचारांना करायला धार...
समटाईम्स लाईफ इज टू शॉर्ट...
एकविसाव्या शतकात लहानग्यांना Jr.kg,Sr.kg चा ताण,
मग कुठे राहते ती माती - माती खेळण्यातली शान....
समटाईम्स लाईफ इज टू शॉर्ट...
थोडे झालो मोठे, मग आले भले मोठे दप्तर आणि सीबीएसईच्या अभ्यासाचा
मारा,
गृहपाठ आणि शाळेच्या activity करता - करता खेळ झाला सारा .....
समटाईम्स लाईफ इज टू शॉर्ट...
तारुण्यात मारली उडी, वाटले आता स्वच्छंद विचार करू, आपल्या स्वप्नाना वाट
देऊ,
परंतु जबाबदार्या वाढल्या आणि पोटा- पाणी साठी नोकरीला जाऊ....!
समटाईम्स लाईफ इज टू शॉर्ट...
झालो आता प्रौढ, मुलीच्या लग्नाची आली काळजी, मुलाच्या शिक्षणासाठी
donation,
एकंदरीतच संसाराचे गाडे ओढता- ओढता जबाबदारीचे झाले
summation....!
