बीज अंकूर
बीज अंकूर
ढेकळाच्या माती खाली
बीज अंकूर आडलं
भेगाळल्या जमिनीत
पाण्या विना ते नडलं ।।
बाप गेला हादरुन
वाट पहाता पहाता
जोडी हात नभाकडे
पाणी मागता मागता ।।
मोल्या माघाचे बियाणे
बाप माती आड घाली
सुटे बखाडीचा वारा
चुळ कळशीने घाली ।।
कसा कोपला निसर्ग
बोले ढेकळा आडून
दुष्ट जाती मानवा तू
नेली झाडी रे तोडून ।।
करा लागवड पुन्हा
वृक्ष वेली फुलतीलं
बळी राजाच्या नशिबी
दिस सोन्याचे येतीलं ।।