STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational Tragedy

3  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational Tragedy

कारण मी आहे स्त्री

कारण मी आहे स्त्री

1 min
14.1K


माझ्या संघर्षाची सुरुवात होते

माझ्या जन्माच्या आधीपासुनच।


माझ्या संघर्षाची सुरुवात होते

माझ्या जन्मापासूनच।


माझ्या संघर्षाची सुरुवात होते

माझ्या बालपणापासूनच।


माझ्या संघर्षाची सुरुवात होते

यौवनी पाय ठेवताच।


माझ्या संघर्षाची सुरुवात होते

माझ्या घरापासूनच।


माझ्या संघर्षाची सुरुवात होते

माझ्या नावाचे अस्तित्व जपण्यापासून।


माझ्या संघर्षाची सुरुवात होते

माझे स्त्री तत्व जगण्यापासून।


माझ्या संघर्षाची सुरुवात होते

माझे मातृत्व उपभोगण्यापासून।


माझ्या संघर्षाची सुरुवात होते

माझे स्व अस्तित्व शोधण्यापासून।


माझ्या संघर्षाची सुरुवात होते

माझे जिवंतपण जाणण्यापासून ।


माझा संघर्ष कधी संपत नाही।

कारण मी आहे स्त्री।




साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational