STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Crime

3  

Asmita prashant Pushpanjali

Crime

बलात्कार

बलात्कार

1 min
272

स्त्री जातीच्या जिव्हारी लागणारा शब्द बलात्कार,

स्त्री जातीची नजर झुकवणारा शब्द बलात्कार,

तरीही समाजाचे परखड सत्य व

वास्तव मांडणारा शब्द बलात्कार।


कुणाच्या शरीराचा बलात्कार,

कुणाच्या मनाचा बलात्कार,

एकदा तिच्या शरीरावर झालेला बलात्कार,

रोजच करतो तिच्या मनाचा बलात्कार।


कुणी करती तिच्यावर नजरेने बलात्कार,

कुणी करती तिच्यावर इशाऱ्याने बलात्कार,

कुणी करती तिच्यावर शब्दाचे बलात्कार,

तर कुणी करती तिच्यावर शरीराने बलात्कार।


कुणी करती तिच्या लाचारीचे बलात्कार,

कुणी करती तिच्या परिस्थितीचे बलात्कार,

कुणी करती तिच्या गरजेचे बलात्कार,

तर कुणी करती तिच्या ध्येयाचे बलात्कार।


कुणी लादती तिच्यावर ओळखीचे बलात्कार,

कुणी लादती तिच्यावर प्रेमाचे बलात्कार,

कुणी लादती तिच्यावर हक्काचे बलात्कार,

तर कुणी लादती तिच्यावर नात्याचे बलात्कार।


कुणी करती तिच्यावर मनोविकाराचे बलात्कार,

कुणी करती तिच्यावर पशूत्वाचे बलात्कार,

कुणी करती तिच्यावर वासनांधतेचे बलात्कार,

तर कुणी करती तिच्यावर शरीर भुकेचे बलात्कार।


निसर्गाचा एक नियम ठरतो तिच्यासाठी बलात्कार,

तिच्या लैंगिकतेची खूण ठरते तिच्यासाठी बलात्कार,

मानववंश वाढण्याचे कारण ठरते तिचे बलात्कार,

ह्या सृष्टीचे सृजन करणे ठरते तिचे बलात्कार।


एखाद्यासाठी एक बातमी असते तिचे बलात्कार,

एखाद्यासाठी कर्तव्य बजावणे ठरते तिचे बलात्कार,

एखाद्यासाठी भाषण ठोकून टाळ्या मिळवते तिचे बलात्कार,

एखाद्यासाठी भावनांचा उद्रेक ठरते तिचे बलात्कार।


कुणासाठी जाती सूचक असते तिचे बलात्कार,

कुणासाठी सामाजिक आंदोलन असते तिचे बलात्कार,

कुणासाठी जातीय दंगली ठरते तिचे बलात्कार,

पण तिच्यासाठी केवळ तिची विटंबना असते तिचे बलात्कार


तिच्यासाठी काय असते हे बलात्कार?

शरीराचा श्राप....

निसर्गाचा श्राप.....

समाजाचा श्राप......


स्त्री जातीच्या जिव्हारी लागणारा शब्द बलात्कार,

स्त्री जातीची नजर झुकवणारा शब्द बलात्कार।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime