STORYMIRROR

Pranil Gamre

Crime

3  

Pranil Gamre

Crime

बलात्कार पीड़ित आणि समाज

बलात्कार पीड़ित आणि समाज

1 min
268

त्या नराधमांना हवस मिटवायची होती म्हणून त्यांनी तिचा वापर केला

 निर्दयी होऊन तिची अवस्था वाईट केली, तिने जीवच सोडून दिला 

मुलगी आपल्या घरातली नव्हती ना मग आपल्याला काय करायचंय,अशी लोकं वागतात 

मुलगी स्वतःच्या घरातली असल्यावर मात्र अनेक माध्यमातून हीच लोकं न्याय मागतात 

साधं तिला न्याय मिळावा म्हणून हॅशटॅग वापरायला सुद्धा लोकांना कंटाळा येतो 

स्वतःच विचार करण्यातच मानव खुश दिसतो, दुसर्यांबद्दल माणुसकी सोडून देतो 

मुलीची जात बघून सुद्धा कधी तिला न्याय मिळवून द्यायला आवाज उठवला जातो 

तर कधी संत्री मंत्रींच्या आशीर्वादाने सुद्धा बलात्कारी सुरक्षित राहतो 

 इथे सेलिब्रिटींना प्राण्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्यासाठी सोशल मीडिया वर पोस्ट लिहिला जातो 

 सर्व सामान्य व्यक्तीच्या अन्याया बद्दल आपल्याला काय करायचंय म्हणत हा समाज गप्प राहतो 

समाजाकडून मंत्र्याच्या कलाकारांच्या मुर्त्युवर शोक व्यक्त केला जातो 

तिथे बलात्कार पिढीत मुलीच्या अत्याचाराबद्दल हाच समाज मौन राहतो 

पिढीत मुलगी आपल्या राज्यातली शहरातली नव्हती ना मग कश्याला आपण व्यकत व्हायचं 

तिला न्याय मिळेल नाहीं मिळेल हे वृत्तवाहिनीतुन फक्त माहित करून घ्यायचं 

राजकारणी पिढीतेच्या विषयाचं राजकारण करत आपली पोळी भाजून घेतात 

तर कधी पिढीतेचा जात धर्म बघूनच तिला आणि तिच्या घरच्यांना मदतीचा हात देतात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime