पाऊस
पाऊस
कडाक्याच्या उन्हातून सुटका म्हणजे पाऊस
निसर्गाचं सौंदर्य जो वाढतो तो म्हणजे पाऊस
येतात जेव्हा आकाशात नभ दाटून
जातात ती सूर्यकिरणे त्यात लपून
जेव्हा वेगाने वाहतो वारा सैरा वैरा
आनंदमय होऊन जातो परिसर सारा
इवली इवलीशी पोरं पाऊसाचा आनंद लुटतात
पशु पक्षी सारे कोरडं राहण्यास आसरा शोधतात
शेतकरी जेव्हा आकाशाकडे आशेने पाहतो
दुष्काळ पडल्यास आत्महत्येस राजी होतो
मनुष्य जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा चिंतीत होतो
जेव्हा जोराने पाऊस पडू लागतो तेव्हा चिडचिड करू लागतो
पाऊस नसला तरी समस्या ह्या असतात
पाऊस असला तरी समस्या संपत नसतात
पाऊस म्हटला की नकोशी वाटते पाले भाजी
पाऊस म्हटला की घ्यावी गरम चहा आणि कांदा भजी
