STORYMIRROR

Pranil Gamre

Others

4  

Pranil Gamre

Others

पाठित खंजीर

पाठित खंजीर

1 min
222

दगा देणारे आपलेच होते अयोग्य ठरेल दोष इतरांना देणं 

चुकलच सर्वांनवर विश्वास ठेवून आपलं समजून घेणं 


खोटं नाट विठ्ठल संभोधत मला ज्यांनी डोक्यावर घेऊन मिरवलं 

त्यांनीच मला मी कमकुवत असल्याचं हीनावलं 


पाठीत खंजीर खुपसून जे घातक होते ते निघून जातील 

माझ्यावर खरं प्रेम करणारे कायम माझ्या सोबत राहतील 


माझ्या सहवासात माझ्या मदतीने जे आज मोठे झाले 

तेच सारे माझ्या विरोधात षडयंत्र रचत आले 


दोन पावलं मागे आलो जरी मोठी झेप मी पुन्हा घेईन 

नेस्तनाबूत करण्यास तुम्हाला सक्षम होऊन मी तुमच्या समोर पुन्हा येईन 


वाटलं असेल काहींना मी सहज खचून जाईन

मात्र माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सर्व ताकतीनिशी लढत राहीन


जे सर्वांत ताकत्वर असतात त्यांच्यावर झुंड मध्ये राहून वार केला जातो

लक्षात ठेवा वाघ मात्र नेहमी एकट्याने लढत राहतो 


Rate this content
Log in