STORYMIRROR

Pranil Gamre

Inspirational Others

3  

Pranil Gamre

Inspirational Others

कोरोना एक बोध

कोरोना एक बोध

1 min
216

हो आलय कोरोनाच संकट देशावर पण ते काही कायमचे नाही राहणार 

खात्री आहे मला आपण सारे एकजुटीने त्यावर विजय मिळवणार 


कुणाला ठाऊक होतं हे संकट आपल्याला माणुसकी शिकवून जाईल 

कारण अनपेक्षित होतं माणूस जात धर्म न पाहता मदतीस धावून येईल 


जे अनेकांना जमलं नाही ते ह्या संकटाने करून दाखवलं 

होताच तो जीव घेणा पण त्याने माणसात माणुसकीला जपवलंं


होत होते हाल या संकटाने लहानापासून मोठ्यांचे आपण या डोळ्यांनी पाहिले 

स्वार्थी झालेल्या ह्या मनुष्याला आज दुसऱ्यांसाठी अश्रू अनावर होत राहिले 


प्रत्येक देशात हा विषाणू मृत्यूचं तांडव करत राहिला 

दर दिवशी एकेकाच्या मृत्यूने, माणूस थक्क होताना पाहिला 


हो माहितीये ह्या कोरोना ने आपल्या सर्वाना खूप त्रास दिला 

जाता जाता सर्वांना स्वच्छता राखण्यास धडा देऊन गेला


थोडे दिवस का होइना पण सर्वांना घरात बसवून कैदी बनवून सोडलं 

पशू पक्षिणी आज पहिल्यांदा माणसाला पिंजऱ्यात घुटमळताना पाहिलं 


आज ह्या विषाणूंमुळे जाणवलं मानवास पिंजऱ्यात अडकून पशु पक्ष्यांचे काय हाल होत असतील 

आपण तर थोडेच दिवस बंदिस्त होतो, मग विचार करा ते जीवनभर घुटमळत नसतील 


आता तरी बोध घे, मानवा कशाला जाती वादात अडकून राहतो 

लक्षात ठेव माणसाच्या मदतीसाठी माणूसच धावून येतो 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational