महापुरुषं आणि राजकारणी
महापुरुषं आणि राजकारणी
ह्या देशातील महापुरुषांनो आज खरंच तुमची कमतरता भासते
जेव्हा ह्या राजकारण्यांच्या बोलण्यात येऊन समाजाची दिशाभूल होताना दिसते
राजकारणी स्वतःच्या स्वार्थापाई समाजात तेढ निर्माण करून लोणी खातात
देवा धर्माच्या नावाने समाजाला लढायला लावून स्वतः मात्र मजा पाहतात
महापुरुषांनो तुम्हाला देखील सोडलं नाही ह्यांनी स्वतःला जमेल तसें आप आपसात वाटून घेतात
मग पुन्हा स्वतःच्या फायद्यासाठी महापुरुषांच्या बद्दल लोकांची मस्तके भडकाऊन देतात
जेव्हा हे राजकरांनी धर्माचं वेड लावून शिक्षणाचं महत्व कमी करू पाहतात
तेव्हा तुम्हा महापुरुषांचे विचार आणि तुम्ही आम्हाला वारंवार आठवतात
अमुक अमुक महापुरुषाच्या विचारांवर चालतो सांगतच ह्यांना लोकांची मतं मिळतात
निवडून येताच स्वतः मजेत राहतात आणि मात्र महापुरुषांचे विचार आणि लोकांचे हित विसरतात
जनते समोर स्वतःला पुरोगामी म्हणतात, नजर चुकवून मात्र पुरोगामी विचार पायदळी तुडवतात
नेत्यांच्या बोलण्यावरून लोकं आजवर ज्या महापुरुषाला मानलं त्याच्याच प्रतिमेवर दगड फेक करतात
