STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational

हळदी-कुंकू

हळदी-कुंकू

1 min
889

हळदी-कुंकू

सण हा आनंदाचा

सुवासिनीचा.....


नको हा सण

विधवांना वेदना

त्या दुःखी मना.....


विचार करा

तिचा काय हो दोष

समाज रोष....


अगोदरच

आतून तुटलेली

दुःखी झालेली....


सण म्हणजे

वाटे तिला डागण्या

नकोच जाण्या....


आधार गेला

खरा आधार द्यावा

तिला बोलवा.....


समान वागा

आधुनिक विचार

ठेवा आचार...


हळदी-कुंकू

विधवांना बोलवा

प्रेम वाढवा....


खरी गरज

हो परिवर्तनाची

आस मनाची....


उचल सखे

टाक पाऊल नवे

घे काय हवे.....


तुम्ही शोभाल

सावित्रीच्या गं लेकी

राहुया नेकी....


नको गं बाई

डागण्या त्या अंतरी

विचार करी...


खरा सण तो

दुःखाचा होई विसर

विचार कर....


संक्रांत बाई

नको करू तू घाई

स्वत:पायी.....


सन्मान कर

आपुल्या भगिनीचा

क्षण सुखाचा.....


त्याच क्षणाला

मन भरून येईल

शीण जाईल....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational