STORYMIRROR

Anupama TawarRokade

Inspirational

3  

Anupama TawarRokade

Inspirational

महिला संतांची थोरवी

महिला संतांची थोरवी

1 min
276

वाचकनवी ही गार्गी

गर्ग गोत्रात जन्मली

बुद्धिमान ही मैत्रेयी

स्त्रिया उपनिषत्काली


संत बहिणाबाई करे

वारी पंढरपुराची

रचतसे हो अभंग

गाते थोरवी विठूची


संत जनाबाई ही भक्त

थोर हो नामदेवाची

सेवा करीतसे जनी

रचे अभंग भक्तीची


चांगदेव जिचे शिष्य

ज्ञानोबाची ही बहिण

संत मुक्ताबाई हुशार

आत्मज्ञानी ही वाघीण


सुंदरशी कान्होपात्रा

भक्त विठ्ठलाची असे

संत महात्म्य जागृत

योगदान रचतसे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational