नारीशक्ती
नारीशक्ती
पूजनीय वंदनीय
वात्सल्य सिंधू त्यागाची
जगज्योती आदिमाया
नारीशक्ती प्रेमाची
अबला समजून कराल
अपमान नारी जातीचा
वेळोवेळी देईल ती
परिचय स्त्रीशक्तीचा
कधी काली, कधी दुर्गा
नारीचे रुप अनेक
राग अनावर झाला
दाखवी रूप प्रत्येक
तिच्या पावित्र्याला
कराल कधी दंश
सतीत्वाच्या तेजाने
नष्ट करेल तुमचा वंश
स्त्री शक्तीला मान देऊन
भरा पाया विकासाचा
तेव्हाच खऱ्या अर्थाने
उद्धार होईल जगाचा
