STORYMIRROR

Anupama TawarRokade

Inspirational

3  

Anupama TawarRokade

Inspirational

स्वातंत्र्यपूर्व महिलांची गाथा

स्वातंत्र्यपूर्व महिलांची गाथा

1 min
262

लढवय्या महिलांची

गाऊ या सारे महती

गाजविले कर्तृत्वाची

शान राखे भारताची


जिजामाता गातो गाथा

घडवले शिवाजीस

पराक्रमी विरांगना

वंदू या येसूबाईस


ताराबाई असो जोधा

गाजवला इतिहास

रणांगिनी लक्ष्मीबाई

लढा देई इंग्रजांस


माहात्मांची कस्तुरबा

असो वा कल्पना दत्त

सरोजिनी, वीणा दास

साऱ्या होत्या देशभक्त


देशासाठी या लढल्या

पेटविली क्रांतीज्योत

प्रितीलता क्रांतिकारी

ठरे स्त्री हुतात्मा स्त्रोत


वीर या कॅप्टन लक्ष्मी

श्रेष्ठ स्वातंत्र्यसेनानी

अली अरुणा लढली

क्रांतिकारी कमलांनी


आनंदीजी झाल्या वैद्य

लढे स्त्रिशिक्षणासाठी

सावित्रीज्योतीजी फुले

लिलाताई सहे लाठी


स्वातंत्र्यपूर्वीच्या काळी

स्त्रिया अनेक लढल्या

देशासाठी क्रांतिकारी

देशभक्त त्या ठरल्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational