STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

3  

Ganesh Punde

Inspirational

सुंदर आयुष्याची पहाट.....

सुंदर आयुष्याची पहाट.....

1 min
183

संयम ठेवू होईल प्रभात जाईल काळोखी रात

चालू अवघड वाट पाहण्या सुंदर आयुष्याची पहाट

तिमिराने या अज्ञानाच्या माणूस होता हरवला

शिक्षणाने जिंकून लढाई माणूस धर्म निभवला

सुबुद्धीने वागू चला ठेऊ मनात एकच ध्यास

चालू अवघड वाट पाहण्या सुंदर आयुष्याची पहाट

नात्यांगोत्यांचे प्रेम घेवून देऊया दुःखात साथ

प्रेम आपुलकी बंधुभावाने टिकवू विश्वासू नात

दिसतील डोंगर दुःखाचे अवघड असतील घाट

चालू अवघड वाट पाहण्या सुंदर आयुष्याची पहाट

एकमताने राहू या सारे नको मानू या धर्म नि जात

स्वार्थ सोडुनी जपू माणूसकी ठेवूया मदतीचा हात

येतील संकट भीतीदायक मिळुनी करूया मात

चालू अवघड वाट पाहण्या सुंदर आयुष्याची पहाट

तुलना नको वा अवहेलना जी मूल्यांचा करते ऱ्हास

स्वप्न सोनेरी बघू चला देश महासत्तेची आस

दुःख मनातील सोडून सारे करू नवी सुरवात

चालू अवघड वाट पाहण्या सुंदर आयुष्याची पहाट

साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational