STORYMIRROR

Ganesh Punde

Inspirational

3  

Ganesh Punde

Inspirational

बाबा घराचा आधार

बाबा घराचा आधार

1 min
301

आईचे सौभाग्य खुला प्रेमाचा भांडार 

बाबा म्हणजे असतो घराचा आधार


सुखाच्या शोधात कष्ट तो झेलतो

घराचा तो भार त्याच्या डोईवर पेलतो

त्याच्या मेहनतीवर चाले मायेचा संसार

बाबा म्हणजे असतो घराचा आधार


आईचा तो हात घराचा तो छत

त्याच्यात सामावे माझं सार गणगोत

आनंदी ठेवतो तो सार घरदार

बाबा म्हणजे असतो घराचा आधार


धीर तोच देतो सुखदुःखाच्या वेळी

नात्याच्या बागेचा तो आहे कुशल माळी

त्याच्या नावावर चाले सारा कारभार

बाबा म्हणजे असतो घराचा आधार


बाबा हरवलं सारं कोसळते घर

बापाच्या कष्टाची कुणा येत नाही सर

सांभाळा दैवत आहे जीवनाचा सार

बाबा म्हणजे असतो घराचा आधार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational