काव्य
काव्य
समाजकार्याचा घेऊन वसा
गल्लोगल्ली मी फिरतो,
नाक मुरडत येणाऱ्याचेही
हसत-हसत स्वागत करतो.
रद्दी, प्लास्टीक, लोखंड
दसऱ्याचा घर खजिना,
महत्त्व जाणूनी साऱ्यांचे
वाट पाहतात माझी ललना.
दिवसदिवस भंगारगोळा
पूनर्वापरास्तव येई कामी,
पर्यावरण प्रदूषणविरहित
निरोगीपणाची देई हमी..
कचऱ्यांच्या ढिगाऱ्यातच
क्षणोक्षणी मी रममाण,
म्हणूनतर सहज वाढते
साफ हवेचे आयुष्यमान.
घरातले भंगार नेऊन
स्वच्छतेचे बीज पेरतो,
मनामनातील भंगारही
सांगा इथे कोण काढीतो.
