STORYMIRROR

Prashant Kadam

Inspirational

4.6  

Prashant Kadam

Inspirational

आईची रजा

आईची रजा

1 min
27.1K


का? आमच्या आईला मिळत नाही रजा

सर्व जण रविवारी घेतात, सुट्टीची मजा !

घरात कामे उरकून, आॅफिसलाती जाते

आॅफिसात ही ती, घरची काळजी करते

आॅफिसमधील कामात, आहे ती तरबेज

बेस्ट एम्प्लाॅई ॲवार्ड मिळवते नेहमीच

सगळी कामे तत्परतेने, करते फटदीशी

आस्थेने सर्वांची, नेहमीच करते चौकशी

संध्याकाळी थकून भागून, घरात ती येते

जरा ऊसंत न घेतां, कामास पुन्हा लागते

घर आवरून, सुग्रास जेवण तीच बनवते

कुटुंबाच्या आरोग्याची, काळजीही घेते

मुलां पासून बाबांपर्यत, सर्वांची लाडकी

हट्ट पुरविते सगळ्यांचे, आहेच हक्काची

निखळ प्रेम कुटुंबावर, छाया देते प्रेमाची

रागावली जर कधी, असते माया ममतेची

सगे सोयरे शेजाऱ्यांशी, संवाद ती साधते

सासर माहेर यांच्यातही, समन्वयच पाहते

सदानकदा हसत खेळत, उत्साही असते

गप्पा गोष्टी करता करता, कामे आटपते

कळत नाही कुठून, एव्हढी ताकद आणते ?

आमच्या मनातलंही, कसं काय जाणते ?

सकाळ ते झोपेपर्यंत, नेहमीची पळापळ

दुसऱ्या दिवशी पुन्हा, तिची सूरू धावपळ

कळत नाही का? आईला मिळत नाही रजा

सर्व किमान घेतात, रविवारी सुट्टीची मजा !

रविवारी तर होते तिची, अधिकच दगदग

खमंग जेवणा साठी,चालू असते लगबग !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational