STORYMIRROR

Manisha Potdar

Inspirational

5.0  

Manisha Potdar

Inspirational

मात करुया

मात करुया

1 min
26.6K


संकटावर आपण मात करुया ll धृ ll

प्रतिकुलातून अनुकूल घडवूया

कुणास दोष देवू नकोया

संकटावर आपण मात करुया ll१ll

संकट आल्यावर कळतंया

खरा मित्र,शेजार,नाती ह्या जानीवा

खोट्या माणुसकीच्या बढाया

संकटावर आपण मात करुया ll२ll

तटस्थ , स्वार्थी राहणा-यांना

माणुसकी ,सहकार दाखवूया

फुखट्यांना माणुसकी दाखवूया

संकटावर आपण मात करुया ll३ll

दुस-याकडे बोट करणा-यांना

मदतीचा हात देवूया,त्यास सांगुया

मदतीला हजामत नको समजूया

संकटावर आपण मात करुया ll४ll

स्वावलंबनाचा अवलंब करुया

एकमेकास सहाय्य करुया

सर्वांना घेवून विकास करुया

संकटावर आपण मात करुया ll५ll

स्पष्ट बोलण्याचा अवलंब करुया

नसती आफत पासुन सांभाळूया

ढोंगी लोकांपासून सावध राहुया

संकटावर आपण मात करुया ll६ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational