STORYMIRROR

भक्ती पाटील

Inspirational

3  

भक्ती पाटील

Inspirational

गावाकडची मैत्री

गावाकडची मैत्री

1 min
150


सेल्फी पुरते उसने हसणे नको

खोट्या अश्रुंमध्ये फसणे नको

पहिल्या सारखी गळाभेट होऊदे

व्हिडिओ कॉल वर दिसणे नको ||१||


गावाकडली मैत्री आपली

मोबाईल मध्ये तिला अडकणे नको

कट्यावरच्या गप्पांना आता

कॉन्फरन्स कॉल नी जोडणे नको ||२||


कागदाच्या विमानाचे खेळ आपुले

मोबाईल फ्लाईट मोड करून

त्या विमानाचे मैत्रीत उडणे नको 

वेळ काढू भेटीचा संवाद साधू

कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असे 

नेटवर्क चे मध्ये लोढणे नको ||३||


जत्रेत कुल्फी वडापाव पार्टी करणे

हे सुखसोहळ्याचे जगणे आपुले 

आता ऑनलाइन पिझा बर्गर वर

उपाशी मरणे नको 

बांधावर खाऊ झुणका भाकर

फास्टफूड चे पोटात आता किडणे नको||४||


बैलगाडी, सायकल शर्यतीचे पळणे आपले

आता व्हिडिओ गेम मध्ये लोळणे नको

खरचटले तरी धावत येणारे आपण

आता दुःखात एकमेकांना विसरणे नको ||४||


काढू वेळ जरा मैत्रीसाठी

नव्या बदलणाऱ्या माणसाच्या गर्दीत 

चेहरे आपले लपवणे नको

मित्रा कसरत जिंदगीशी करू

मैत्रीच्या नात्यात हारणे नको ||५||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational