STORYMIRROR

भक्ती पाटील

Inspirational

3  

भक्ती पाटील

Inspirational

माय मराठी

माय मराठी

1 min
162

जन्मल्यावर बोबड्या शब्दातून तू बोलतेस

हळूहळू उच्चरासोबत तू अजून खुलतेस ||

तू मरेपर्यंत अबाधीत आहेस 

कारण तू तर जगणं शिकतेस ||१||


तू पावलापावलावर बदलतेस

बोलीभाषा अहिराणी मालवणी 

अनेक रुपात अस्तित्व रेखाटतेस ||

सह्याद्रीच्या कड्या मधून विदर्भापर्यत

लय,अदा,गोडी मधून तू बहरतेस ||

कधी परखड कधी मृदू कधी गावरान

अशी तू सर्वत्र नांदतेस ||२||


पूर्वी होता पाहुणचार उच्चारी नमस्कार

आता इंग्रजीत हाय हॅलो वरती भार

आईबाबांची जोडी तिथं आले मम्मीडँडी ||

वाढवू मराठीचा दर्जा

तिजला नको अशी चौकट बेडी ||३||


तू नसतीस तर नसते झाले व्यक्त प्रेम

तू नसतीस तर नसती झाली नाती सक्षम

तू वाढावी सर्वत्र फुलावी ||

तु प्रत्येक मनामनात रुजावी ||४||


तू इतिहास गिरवले, तू भविष्य घडविले

तू संस्कृतीला मानाने जगवले 

तुला ऐकणं तुझ्यासोबतिने बोलण ||

तू मराठी वाघिणीचे दूध

तू श्वासाहून किमयागिरी

तुझ्याविना जगणं होईल कठीण ||५||


तू भाषा, तू आशा तू माय मराठी

ना तुटावी जनोजन्मी ही नाळ

नित व्हावा तुझा सांभाळ

तुझ्या छायेत लाभते पुण्याई ||

तुझ्याविना ना होई जगण्याची उतराई ||६||


तू आहेस म्हणून घडली ओळख अस्तित्वाची

तू नसती तर कशी मिळेल वाट जगण्याची

तुला गौरवताना वाटतो अभिमान ||

तू केवळ भाषा नाही तू जगण्याचा स्वाभिमान ||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational