STORYMIRROR

भक्ती पाटील

Inspirational

3  

भक्ती पाटील

Inspirational

राजमाता जिजाऊ

राजमाता जिजाऊ

1 min
159

नाकारून सती प्रथा दिलासा नवा 

स्त्रीला जगण्याचा अधिकार 

परकी स्त्री मातेसम गिरवला तू संस्कार ||१||

 

स्वराज्य स्वप्न तुझ्या उरात जन्मले

विरमाते तुझ्यामुळे शिवबा शंभूबाळ घडले ||२||


तू रणरागिणी तू हिरकणी 

तुझ्या उदरी जन्मले स्वराज्याचे धनी ||३||


तू उभी तेजस्वी मराठमोळी नार

तुझ्या ध्येर्याने उजळली शिवबांची तलवार ||४||


तुझे संस्कार बोल जाणुनी त्यातून स्वराज्याचे मोल

महाराज लढत राहिले पाठीशी जिजाऊ उभी ढाल |५||


स्वराज्याची शान तुझ्या नावाने झळकते इतिहाचे पान

मुजरा आऊसाहेब तुम्हास प्रणाम वंदन ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational