STORYMIRROR

भक्ती पाटील

Inspirational

4  

भक्ती पाटील

Inspirational

# पोरी इतकी मोठी हो #

# पोरी इतकी मोठी हो #

1 min
255

आभाळ सुद्धा वाकेल पोरी इतकी मोठी हो 

जमिनीशी भिडताना अंकुराचा संघर्ष व्हावा तसा लेकीबाईचा जन्म हा ||१||


पण पदरात लाज गुंडाळताना विजेची ताकद उदराला गुंडाळुन घे 

कोणी केली हिम्मत लाज छेडायची तू वीज होऊन त्याची राख कर पोरी तू इतकी मोठी हो ||२||


बाईपण चुल फुंकण्यात नाही हातात बांगड्या जरी असल्या 

तरी तलवारीच पात पेलायला दिलाय आदर्श जिजाऊ लक्ष्मीबाई ने पोरी तू इतकी मोठी हो ||३||


उदर फाटून जीव वाढवायचा आपण आणि मुलगी नको हा अन्याय का ?

अ ग तू न्याय कर म्हणजे मुक्या कळ्या नव्यानं फुलतील पोरी तू इतकी मोठी हो ||४||


महिन्यातून अंगातून रक्त काढून नव्यानं जन्म घेतीस तर 

उभा जन्म सार्थकी लाव पोरी तू इतकी मोठी हो||५||


रडू नको आईपण

बाईपण देताना देवाने स्त्री शक्तीपण दिलीय विसरू नको ||६||


रडणं सोड जगणं शिक

तू जगशील तेव्हा इथं उद्याची पहाट आहे पोरी तू इतकी मोठी हो ||७||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational