हिरकणी
हिरकणी
काय बोलाव त्या प्रराक्रमावर
जीन कातडी पांघरली त्या खडकावर ||१||
भळभळणार रक्त सुद्धा
खडकाला सोसलं नसेल
मातेचं मातृत्व त्या
कड्यासंग लढल असेल ||२||
लेकरांच्या भुकेने ती
सरसर खाली येत होती
लुगड्याची चिंधी ती
दोरी म्हणून घेत होती ||३||
अंगावरल्या जखमा
रात्रीपेक्षा भयाण होत्या
तिच्या धडसासमोर
साऱ्या वेदना शमावल्या होत्या ||४||
अंगभर मायेचा पाजर घेऊन
ती उभा गडकडा उतरली
तिच्या जिद्दीसमोर काळी रात्र हरली
लेकराच्या प्रेमापोटी
हिरकणी माय शुरासम अवतरली ||५||
