STORYMIRROR

भक्ती पाटील

Inspirational

3  

भक्ती पाटील

Inspirational

स्त्रीशक्ती

स्त्रीशक्ती

1 min
136

उंबरा ओलंडुन घराला मंदिर 

बनवणारी लक्ष्मी आहे ती ||

संसाराचा गाडा चालवणारी

देवाऱ्यातली माऊली आहे ती ||१||


दुःखावेळी ढाल होऊन उभी राहते

सुखाच्या अंगणात तीच आनंद पेरते ||

संस्कारांना पदराशी बांधून

त्याची ऊब ती जगण्यासाठी देते ||२||


दिवस उजाडतो तशी ती

तिच्या कर्तव्यांना जागवते ||

काळोखी संकटामध्ये

प्रकाशासारखी लुकलूकते ||३||


तान्हाच्या हास्यापासून

वृध्दाच्या अश्रूपर्यंत ती सर्वांना पुरते ||

ती कधी थकत नाही

भिरभिरणाऱ्या शरीरासोबत नव्याने बहरते ||४||


ती न उलगडणारी कोड आहे

तिच्यामुळे अनेक नात्यांची जोड आहे ||

कोणतीच तक्रार नसणार

ती आनंदाच झाड आहे ||५||


ती नसती तर काय झाले असते

हा विचार निशब्द करून जातो ||

तिच्या अस्तित्वाचा ठसा 

पावला पावला वर उमटत राहतो ||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational