# लॉकडाऊन परिस्तिथी #
# लॉकडाऊन परिस्तिथी #
जीवघेणी स्पर्धा रखरखत ऊन
सोबतीला अधाशी भूक
पोट टाकते जाळून ||१||
पिण्यासाठी पाणी नाही
अंग घामानं ओलं
डोईवर बोचक
पायात फाटकी चप्पल ||२||
पाय थकत चाले पण
वाटा काही संपत नाही
शरीर थकतय पण
मन अजून हारत नाही ||३||
समोर दिसतंय मरण पण
गडी पावलं अजून थांबवत नाही
घरी पोहचण्याची शाश्वती नाही
पण घरी जाण्याची ओढ बोलवत राही ||४||
एकेकाळी कुटुंबाला पोसण्यासाठी
बाहेर पडलेला हा मजूर
आज त्याच कुटुंबासाठी
लढतोय संघर्षाच्या मार्गावर ||५||
आभाळाच छत जमिनीच अंथरून यामध्ये
शरीर विसावा घेत तर दिवसा भर ऊन चटके देत
वाट पाहत कुटुंब जोडतय देवाकडे हात
डोळ्यातली आसव जागवतात एक एक रात ||६||
कसला देवा हा संघर्ष
हृदयाचे ठोके चुकवणार
विचारांच्या पलीकडच्या
यातना दाखवणारा ||७||
